राजापूर:- (प्रमोद तरळ) तालुक्यातील शांत सुस्वभावी व्यक्तिमत्त्व, अभ्यासू आणि प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असलेले ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी ते आता राजापूर पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून दिलिपजी नाटेकर यांची पदोन्नती झाली आहे
श्री नाटेकर यांनी १९८५ मध्ये ग्रामसेवक म्हणून नोकरीची सुरुवात केली सन १९९३ ला ग्रामविकास अधिकारीपदी राजापूर तालुक्यात कार्यरत होते सन २००३ मध्ये विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली पंचायत समिती दापोली येथे पाच वर्षे, पंचायत समिती सोमेश्वर येथे पाच वर्षे कार्यरत होते तदनंतर १ मार्च २०२४ रोजी शासनाच्या आदेशानुसार श्री नाटेकर यांची राजापूर पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली अत्यंत मनमिळाऊ व जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या एका सच्चा अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर राजापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे