बातम्या

राजापूर प्रतिष्ठान अध्यक्षपदी‌ मोहन पाडावे..

राजापूर – (प्रमोद तरळ) समाजकार्याची आवड‌ आणि सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्या काही लोकांनी एकत्र येऊन राजापूर प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे यांची निवड करण्यात आली आहे
क्रिडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन झाली असून या संस्थेच्या माध्यमातून क्रिडा स्पर्धा भरवणे, शालेय विद्यार्थी व तरुणांमध्ये क्रिडा विषयक आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विविध क्षेत्रातील गुणवंत प्राविण्य प्राप्त खेळाडू तसेच सामाजिक क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.तसेच आरोग्य शिबीर भरवणे, गरजूंना मदतीचा हात देणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत
प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी मोहन पाडावे, नंदकुमार पुजारे, हर्षदा खानविलकर, (उपाध्यक्ष)
प्रकाश कातकर (कार्याध्यक्ष), सुधीर विचारे (उपकार्याध्यक्ष), राजू काशिंगकर (सचिव) सुभाष नवाळे, संदीप पवार (सहसचिव), गोपाळ गोंडाळ (खजिनदार) प्रकाश पुजारे (सहखजिनदार) सुबोध पवार, रवींद्र जाधव (हिशोब तपासणीस), राजू जोगळे (प्रसिध्दीप्रमुख) राजेंद्र गुरव,गौरव सौंदाळकर, अभिजित कदम, संदीप देसाई, सचिन नाचणेकर, विवेक गुरव, निलेश फाटक, विजय बाणे, संदीप पवार, साहिल मुणगेकर, प्रकाश नाचणेकर, संतोष मोंडे, शरद मोरे (सदस्य), दिपाली पंंडीत, रवींद्र नागरेकर, रमेश पाडावे,अशोक पाडावे (प्रमुख सल्लागार) आदी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!