विजय शेडमाके
दि.१९/०३/२०४
गडचिरोली:-चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार कोण असणार हे अजूनही गुलदस्त्यातच असून महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे चिमुर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळावी हे राजे धर्मराव बाबा आत्राम पहिले पासूनच आग्रही भूमिका घेत आहेत. गेल्या दहा वर्षापासून, सदर जागेवर भाजपाचे वर्चस्व असून विद्यमान खासदार अशोक नेते संपूर्ण चिमूर लोकसभा क्षेत्रात गावागावात फिरून सभा, संमेलन, बैठका घेत आहेत परंतु भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीमुळे सदर जागेवर भाजपा व राष्ट्रवादी की भाजपच्या वाटेला जाणार हे दिल्लीत पक्षश्रेणी येत्या एक-दोन दिवसात ठरविले जाणार त्यामुळे भाजपाच्या गोठ्यात दाखदुखी निर्माण झाली आहे. तर म.वि.आ. मध्ये डॉक्टर नामदेवराव कीर्तन यांना उमेदवारी मिळणार म्हणून ते बिनधास्त असून महायुती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊ कशी प्रार्थना करीत आहेत महायुतीचे भाजपाकडे अशोक नेते व डॉक्टर मिलिंद नरोटे हे प्रबळ उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे राजे धर्मराव बाबा आत्राम हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत कोण कुणाची तिकीट कापणार व कोणाला उमेदवारी मिळणार याकडे मतदाराचे लक्ष लागले आहे.