महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासघाच्या पाठपुराव्याला यश
बदलापूर – (प्रमोद तरळ) मागील ३ वर्षापासून बदलापूर रेल्वे स्टेशन पश्चिम बाजूला तसेच प्लॅटफॉर्म १ व २ वर देखील शौचालय नाही. तसेच . रेल्वे प्रवासी महिला, दिव्याग .जेष्ठ नागरिकांना ब्रिज चढून प्लॅटफॉर्म ३ वर अथवा पूर्वेस जावे लागत आहे.
बदलापूर रेल्वे स्टेशन वरून दररोज सव्वा लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात, तसेच शहरीकर देखील झपाट्याने वाढले आहेत भाजी विक्रेत्या महिलाची दिव्यांग व नागरीकाची कुंचंबना होत आहे, संविधानाने राईट टू पी चा अधिकार दिला आहे, स्वच्छ शौचालय ही मुलभूत गरज आहे
मुंबईदिशेकडे तसेच कर्जत दिशेकडे शौचालयाची उभारणी करा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत (𝚉𝚁𝚄𝙲𝙲 𝚖𝚎𝚖𝚋𝚎𝚛) यांनी १ मार्च २०२४ रेल्वे प्रशासन व कुळगाव- बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना तसेच रेल्वे प्रशासनाला केली होती, याची दखल घेऊन ४ एप्रिल२०२४ रोजी, होम प्लॅटफॉर्म १ बाहेरील पश्चिमबाजूला दोन शौचालयसाठी मुख्याधिकारी गोडसे यांच्या दालनात बैठक पार पडली, त्यानी महासंघाचे सर्व ऐकून घेऊन त्यांनी सुचविलेल्या ठिकाणाची लवकर पाहणी करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत, प्रिया गायकवाड व मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी उपस्थित होते