सन २०२४ मध्ये पार पडलेल्या ड्रॉईंग ग्रेड परीक्षा,इंटरमिडीएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. इंटरमिडीएट ग्रेड ड्रॉईंग परीक्षेत दि मॉडेल च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले त्यामध्ये संजीवनी रमेश भुवड (बी श्रेणी ),संस्कृती सुनिल कांबळे (बी श्रेणी ),निरजा राजकुमार धातकर (बी श्रेणी ),अन्वया निलेश पावरी (बी श्रेणी ) ,श्वेतम रुपेश लोकरे (सी श्रेणी ) प्राप्त केली आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री विनोद पेढे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. आज या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र
