बातम्या

भंडारी समाज संघाच्या उपोषणाला भारतीय मजदूर संघाचा पाठींबा.

                    रत्नागिरीतील पतितपावन मंदिर हे दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधल्याचा पाठ्यपुस्तकातील इतिहास बदलून आठवीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात पतितपावन मंदिर वि दा सावरकर यांनी बांधल्याचा खोटा इतिहास शिकवला जात आहे. यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते परंतु अजूनही शासनाकडून कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही.
         भागोजीशेठ कीर यांचा इतिहास जाणीवपूर्वक पुसण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे त्याचा निषेध म्हणुन प्रजासत्ताक दिनी भंडारी समाज व इतर समाज संघटना यानी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे त्यानिमित्ताने आज पतितपावन मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भारतीय मजदूर संघाच्या संघटनमंत्री संजना वाडकर यांनी भागोजी शेठ कीर यांचे दैदीप्यमान कार्य पुसले जावू नये म्हणून या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आणि हे कोणत्या एका व्यक्तीचे किंवा एका समाजाचे काम नसून संपूर्ण मानवजातीचे काम आहे त्यामुळे सर्वानी या उपोषणामध्ये भाग घेवून सरकारला तात्काळ चूक सुधारण्यासाठी भाग पाडावे असे आवाहन केले.  यावेळी संत रोहिदास समाजाचे श्री विजयशेठ खेडेकर,  तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुवीर शेलार, पांचाळ सुतार समाजाचे अध्यक्ष श्री भगवान सुतार,  कटबु समाजाचे अध्यक्ष बी टी मोरे,  अण्णा लिमये, निवृत्त डिवायएसपी विलास भोसले,  सुरेंद्र घुडे, मंगेश शिरधनकर , म. दा. मोरे, अँड सौ प्रज्ञा तिवरेकर, चंद्रहास विलणकर, मुकुंद विलणकर, राजेंद्र विलणकर,  नितीन तळेकर,  बाबू धामणस्कर, संजना वाडकर,  सौ राखी भोळे,  सौ दया चवंडे,  सौ वारेकर, सौ ज्योती तोडणकर, सौ सावली मयेकर, सौ आदिती भाटकर,  कौस्तुभ नागवेकर , परिस पाटील, दिलीप रेडकर, सिद्धेश सुर्वे,  श्रेयस कीर,  सदानंद मयेकर, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!