देवरुख नगरीतील शिक्षक व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नावाजलेले मार्गदर्शक वासुदेव मोरेश्वर साने, यांचे वयाच्या ८४व्या वर्षी रविवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने रोहा येथे निधन झाले. सद्गुरु लोकमान्य वाचनालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला स्वर्गीय साने गुरुजींचे विद्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक व हितचिंतक यांची उपस्थिती होती. स्वर्गीय साने गुरुजींच्या निगर्वी व धडपडा स्वभाव, त्यांची शिक्षणाबद्दलची असणारी आस्था व प्रेम, शिकवण्याची सोपी पद्धत, मराठी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता व गणित या विषयासंबंधीची त्यांची स्वतःची कायम लक्षात राहणारी सूत्रे व क्लुप्त्या, याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेचा पुढील अभ्यासात व स्पर्धा परीक्षांसाठी साने गुरुजींनी दिलेल्या विद्यारुपी शिदोरीचा यशस्वीतेसाठी व भावी करियरसाठी झालेला उपयोग याबाबत उपस्थितांनी विविधांगी माहिती दिली.

शुभेच्छुक : संदीप (बाबू) सुर्वे.
भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस रत्नागिरी.
साने गुरुजींच्या सहकारी शिक्षकांनी शिक्षकांचे शिक्षण असणाऱ्या साने गुरुजींच्या कार्याचा सविस्तर आढावा या प्रसंगी घेतला. साने गुरुजी यांच्या देश-परदेशात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतः किंवा संदेशाच्या साह्याने गुरुजींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वर्गीय साने गुरुजींच्या शैक्षणिक वारशाचे जतन व्हावे तसेच त्यांच्या कर्तुत्वाच्या आठवणी कायम राहाव्यात, यासाठी देवरुखमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्रासारखे कायमचे उपक्रम सुरू करण्याविषयी विचार विनिमय यावेळी करण्यात आला.

शुभेच्छुक : परशुराम उर्फ दादा ढेकणे
भारतीय जनता पार्टी ओबीसी युवा अध्यक्ष रत्नागिरी.