निवधे गावातील पुलाला निधी मंजूर केल्यामुळे निवधे ग्रामस्थानी मानले आमदार शेखर निकम यांचे आभार
चिपळूण : (ओंकार रेळेकर )तालुक्यातील निवधे गावात जाणे येण्यासाठी लोखडी ब्रीज वरुन प्रवास कराव लागत असे. प्रवासाच्या दृष्टीने तो ब्रीज धोकादाय ठरत होता. निवधे गावला दळणवळणाचा प्रश्न सुद्धा मोठ्या प्रमाणात भेडसावत होता तसेच निवधे येथे पुल झाला तर बामणोली, निवधे, साखरपा गाव जोडले जाणार आहेत त्यांचा फायदा मार्लेश्वर मध्ये येणा-या घाटमाथ्यावरुन पर्यटकांना चांगला होणार आहे व पर्यटनाच्या दृष्टीने फायद्याचे होणार असल्याने हा पूल होणे आवश्यक होते.
आमदार शेखर निकम हे पावसाळ्यात कार्यक्रमासाठी निवधे दौ-यावर जात असताना निवधे गावातील लोखंडी ब्रीज वरुन प्रवास करत होते नदीला पुर आला होता त्या पावसातून त्या जून्या ब्रीजवरुन चालत जात असताना जीवघेणा बसत बसत प्रवास रविंद्र गुरव, प्रविण बेंद्रे आणि इतर गावकरी व कार्यकर्त्यासोबत केला त्यावेळीच मार्लश्वर चरणी प्रार्थना केली की यदाकदाचित या मतदार संघाचा आमदार होण्याची संधी लाभली तर या निवधे येथील पुल बांधण्यासाठी निश्चय केला.2019 साली शेखर निकम आमदार झाले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यानी केंद्रीय मार्ग निधी (CRF) यामध्ये प्रत्येक आमदार यांस रु. 3.00 कोटीची कामे सुचविण्यास सांगितली त्यावेळी क्षणाचा विलंब न करता निवधे पुलाचे काम सुचवले त्यावेळी मात्र इतर आमदारांनी मतदानाचा विचार करता प्रत्येकाने दहा गावातील दहा पुल सुचवले होते. आमदार शेखर निकम यांनी मतांचा विचार न करता एका गावाचा विचार केला काराण हा पुल आता झाला नाही तर परत कधीही होणार नाही. यासाठी हा निधी पुरणारा नव्हता तरी आपल्या ओळखीने जास्तीचा निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले आणि केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत (CRF) 2020-21 मधून रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील रा.मा. 174 मारळ ते निवधे कळकदरा जाधववाडी साखरपा ते रा.म.मा. 166 शाखेसह रस्ता प्र.जि.मा. 100 वर कि. मी. 0/400 मध्ये बावनदीवर मोठया पूलाचे बांधकाम करणेसाठी रु. 3 कोटी 97 लाखाचा निधी मंजूर करुन आणला व आज त्यांचे भूमिपुजन संपन्न झाले आमदार शेखर निकम यांनी या गोष्टी आज भूमिपुजन प्रसंगी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की आमदार झाल्यानंतर विकास कामे करणे सोपे जाईल व आपणास कोणतेही यामध्ये अडथळे येणार नाहीत असे वाटत होते मात्र या गोष्टी करणे एवढे सोपे नाही. आज काल कुणीही येतो आणि माध्यमांद्वारे कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो परंतु ही कामे एक अन दोन दिवसात पत्र देऊन मंजूर करता येत नाहीत किंवा एखादे आदोलन करुनही लगेच मंजूर होत नाही तर यासाठी सततचा पाठवपुरावा करावा लागतो व तिथपर्यत पोचावे लागते.
आ.निकम म्हणाले की कामाचे श्रेय कुणी घ्यावे हे महत्त्वाचे नसून ते काम पाठपुरावा करुन मंजूरी आणून पुर्ण करणे आणि कोणत्याही पक्षाचे राजकारण न करता ते सर्वानी एकत्र येऊन प्रत्येक गावाचा व त्याद्वारे मतदार संघाचा विकास करणे हे महत्वाचे आहे. राजकारण हे एक दिवसापुरते असते मात्र आपणास विकास करणेसाठी लोकांच्या सानिध्यात राहून त्यांच्या माध्यमातून कायम विकासाठी प्रयत्न करावे लागत असतात. आत्ताच नाही तर यापुढेही कोणतही राजकारण न करता मी प्रत्येक गावाचा व मतदार संघाच्या विकासासाठी कठीबद्ध असेन.हा पुलाचे कामासाठी निधी मंजूर करुन आणल्यामुळे निवधे गावातील तसेच संगमेश्वर तालुक्यातील जनतेने आमदार शेखर निकम यांचे कौतुक केले असून सर्वानी आभार मानले आहेत.
यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्रजी माने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी काँग्रेस सर चिटणीस सुरेश बने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विवेक शेरे, आरडीसीसी बँक संचालक नेहा माने, राजेंद्र सुर्वे, सा,बा विभाग देवरुख पुजा इंगावले, शाखा अभियंता विकास देसाई, ठेकेदार प्रमोद अधटराव, बंड्या बोरुकर, छोट्या गवाणकर, वेदा फडके, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसळे, हुसेन बोबडे, निलेश भुवड, शामराव सावंत, जनक जागुष्टे, सचिन मांगले, राजू वनकुंद्रे, प्रफुल्ल बाईत, मंगेश बांडागळे (सरपंच, मुरादपूर), बापू शेट्ये (सरपंच, कोंडगाव), वैष्णवी शिंदे (सरपंच, बामणोली), बंटी गोताड (सरपंच, कनकाडी), सोनाली गुरव (सरपंच, निवे), सोनल चव्हाण (सरपंच, बोंडे), मानसी करंबेळे (सरपंच, कासारकोळवण), मंगला गुरव (सरपंच, मारळ), संदेश घाग (सरपंच, बेलारी), अरुणा अणेराव (सरपंच, आंगवली), निधी पंदेरे (सरपंच, वांझोळे), नंदू सावंत, आण्णा परब, प्रकाश सावंत, राजू अणेराव, रामू पंदेरे, प्रविण बोंद्रे, किसन राणे, रविंद्र गुरव, प्रविण बेंद्रे, सुनिल लिंगायत, शंकर गुरव (गावकर), राजेश गुरव (गावकर), शशिकांत शिंदे (जागा मालक) जितेंद्र शेट्ये, अनंत जाधव व सर्व दशक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो : रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करताना आमदार शेखर निकम आणि पदाधिकारी, ग्रामस्थ
छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)