देवरुख : कै. द. ज. कुलकर्णी जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथे आयोजित करण्यात आली आहे. सन २०२२-२३ हे वर्ष कथाकार जी. ए. कुलकर्णी व गंगाधर गाडगीळ यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने'नवकथा व स्वातंत्र्य' या विषयावर आधारित कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी कथाकथनासाठी संघर्षकथा या आशयावर आधारित समाजातील शोषित वर्गांचे अस्तित्व, त्यांचे आत्मभान, त्यांनी प्राप्त केलेले स्वातंत्र्य, त्यांचा जीवन संघर्ष दर्शवणाऱ्या कथा निवडावयाच्या आहेत. स्पर्धकांनी
दि. २२ नोव्हेंबर, २०२२
पर्यंत खाली दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे Link --- https://forms.gle/cxVSvhFv2TegWLLd7
या कथाकथन स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक वर्गात चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल. कनिष्ठ महाविद्यालयाने पाठवायचा स्पर्धक संख्येवर कोणतेही बंधन नाही. कथाकथन मराठी भाषेतच करावयाचे आहे. प्रत्येक स्पर्धकाला कथा सादरीकरणासाठी किमान १० मिनिटे व कमाल १३ मिनिटांचा अवधी दिला जाईल. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धकांसोबत येणाऱ्या शिक्षकांना साध्या एस. टी. बसच्या येण्या-जाण्याचा प्रवास खर्च अायोजकांकडून दिला जाईल. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आयोजकांनी नियुक्त केलेल्या परीक्षकांचा निर्णय सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. स्पर्धासंपल्यानंतर अर्ध्या तासांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभ सुरू होईल. दिनांक ३० नोव्हेंबर रोजी स्पर्धा सकाळी ११:०० वाजता सुरू होणार असून तत्पूर्वी स्पर्धकांनी अर्धा तास अगोदर उपस्थित राहून नाव नोंदणी करावयाची आहे. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांकडे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक शाळेतील ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रा. सौ. सीमा संजय कोरे ९४२३०८९०१७ व प्रा. श्री संदीप सुरेश मुळ्ये ९४२१२२८८१९ तसेच महाविद्यालय कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक ०२३५४-२६००५८ यावर संपर्क साधावा. या कथाकथन स्पर्धेत जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले आहे.