बातम्या

ग्रामसेवक मंगेश पांचाळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्काराने सन्मानित.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) चिपळूण तालुक्यातील पाचाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मंगेश केशव पांचाळ यांना साप्ताहिक भगवे वादळ प्रथम वर्धापन दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार मुंबई धारावी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या समारंभास माजी महापौर स्नेहल आंबेकर, कामगार नेते अभिजित राणे, माजी आमदार बाबुराव माने, मुंबई चौफेर चे संपादक प्रफुल्ल फडके व भगवे वादळ साप्ताहिक संपादक दत्ता खंदारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मंगेश पांचाळ हे मूळचे राजापूर तालुक्यातील बागवे वाडी येथील रहिवासी आहेत. त्यांना क्रिकेट व गायनाची आवड आहे. पांचाळ यांना या पूर्वी राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक , राज्यस्तरीय, समाजरत्न, नॅशनल श्री अवार्ड या पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे. सदर चा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले असून या पुढे असेच आपण कार्यरत राहणार आहे असे त्यांनी सांगितले. सदरचा पुरस्कार मिळाल्या बाबत ग्रामपंचायत पाचाड, मुंबई मंडळ बागवेवाडी व इतर मान्यवरानी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!