बातम्याराजकीय

दांडे आडोमधील घनकचरा प्रकल्प का रखडला?८ दिवसांत कार्यवाही करा अन्यथा भाजप करणार जनआंदोलन : ॲड. दीपक पटवर्धन यांचा इशारा.

रत्नागिरी : शहरातील कचरा व्यवस्थापन हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषद प्रशासन हलगर्जीपणा करत असून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. दांडे आडोम येथे घनकचरा प्रकल्पाच्या जागेला संरक्षक भिंतसुद्धा उभी केली आहे. मग तिथे कचऱ्याची विल्हेवाट का लावली जात नाही असा सवाल करत साळवी स्टॉप येथील कचरा पेटवणे तत्काळ बंद करा, अन्यथा जनआंदोलन उभे करू, असा इशारा भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिला आहे. यासंदर्भात नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी निवेदनही पाठवले आहे. साळवी स्टॉप परिसर तसेच शहरानजिकच्या परिसरात अस्ताव्यस्त पसरलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि हा परिसर तत्काळ स्वच्छ करावा, अशी मागणीसुद्धा ॲड. पटवर्धन यांनी केली. येथील रहिवाशांच्या अनेक तक्रारी आहेत, परंतु पालिका दुर्लक्ष करत आहे. ८ दिवसांत सुधारणा न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भात ॲड. पटवर्धन यांनी सांगितले, शहरालगत मिऱ्याकडून येणाऱ्या परटवणे, साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य आहे. मिऱ्या खाडीलगत, खाजणालगतच्या भागात कचऱ्याचे ढीग आहे. चंपक मैदानानजिकच्या रस्त्यावर प्रचंड कचरा असून पादचारी, वाहनचालक आणि स्थानिक रहिवासी, आस्थापनांना त्याचा त्रास होत आहे.
           कचऱ्याची समस्या उग्र रूप धारण करत आहे. या समस्यांचे मुख्य कारण नगर परिषद प्रशासनाचा गलथानपणा हेच दिसत आहे. दांडे आडोम येथे घनकचरा प्रकल्प मंजूर आहे. त्या पूर्ण जागेला कंपाऊंड वॉल बांधून झाली आहे. मात्र या जागेचा उपयोग जाणीवपूर्वक केला जात नाही, ही गोष्ट खूप गंभीर आहे. नगरपरिषदेचा पैसा खर्च करून परत त्याचा उपयोग न करणे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शहरात कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण ही गोष्ट पालिका प्रशासनाने गांभिर्याने घेतली पाहिजे, असे स्पष्टपणे ॲड. पटवर्धन यांनी सुनावले. येत्या आठ दिवसांत पालिका प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास जन आंदोलन उभारू, असे ॲड. पटवर्धन यांनी ठणकावले. तसेच परिषदेविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल. असा टोकाचा मार्ग अवलंबावा लागल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपल्यावर असेल, असा इशारासुद्धा त्यांनी परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!