खेड : लोटे ओधिगिक वसाहतीतील डिवाईन कंपनीत झालेल्या स्पोटाच्या दुर्घटने प्रकरणी रिपाई आक्रमण झाली आहे या स्पोटात मृत्य मुखी पडलेल्या कामगारांसह जखमी कामगारांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी दिला आहे.
या केमिकल कंपनीत फ्राब्रेकेशन काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन ८ कामगार जखमी झाले होते स्फोटात गंभीर रित्या जखमी झालेल्या संदीप कुमार परवेज सावा उर्फ गुप्ता यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर अन्य ७ जखमींवर उपचार सुरू आहेत तसेच पाठोपाठ शुक्रवारी मध्यरात्री विपल्य मंडल या गंभीर भाजलेल्या कामगाराचा मुंबई येथील एरोली नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या दुर्घटनेनंतर रिपाईचे कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील पदाधीकाऱ्यानी दुर्घटनाग्रस्त कंपनिला भेट दिली
या भेटी दरम्यान मृत व जखमी कामगारांना न्याय देण्यासाठी रिपाईने पुढाकार घेतला आहे मृत कामगारांसह जखमी कामगारांना जो पर्यंत योग्य तो न्याय मिळत नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नाही असा इशारा दिला आहे मृत व जखमी कामगारांना तातडीने मदत देण्याची मागणी करत ही बाब गांभर्याने न घेतल्यास आदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे असे सकपाळ यांनी पत्रकार यांना सागितले.. दखल न्यूज महाराष्ट्र..