बातम्या

रत्नागिरीच्या बाजारपेठेत तरुणावर झालेल्या हल्ल्याचे तीनहीआरोपी पोलिसांच्या ताब्यात.

रत्नागिरी : रत्नागिरी मध्ये भर बाजारपेठेत बुधवारी रात्री 8 च्या सुमारास काँग्रेसभुवन, प्रभा हॉटेल जवळ गल्लीमध्ये हा हल्ला झाला हा हल्ला आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचे स्पष्ट झाले असून कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघांना शहर पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे.
         रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव येथे राहणाऱ्या नागेश गजबार या तरुणाला त्याचे दोन मित्र शुभंम सोळंखी (रा.गवळीवाडा), महेश शेळके (रा. शांतीनगर), या दोघांनी फोन करून शहरातील पाऱ्याची आळी येथे बोलावून घेतले. परंतु नागेश पऱ्याची आळी येथे आल्यानंतर त्यातील एकाने त्याच्या डोक्यात लादी घातली. त्यानंतर दुसऱ्याने धारदार कोयत्याने नागेशच्या डोक्यावर, हातावर सपासप वार केले. तर अक्षय मानेही त्यांच्या सोबत होता. ते तिघेही घटनास्थळावरून हल्ल्यानंतर भाजी मार्केट येथून दुचाकीवरून पळून गेले पळून गेले होते.
         स्थानिक नागरिकांनी नागेश गजबारला जिल्हा रुग्णालयात दाखल केले नागेशवर अद्याप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागेशने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीसांनी शुभम सोळंखी (रा.गवळीवाडा), महेश शेळके रा. (शांतीनगर), अक्षय माने (रा.गवळीवाडा) या तिघांविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर  सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले यांच्या नेत्वृवाखालील पथक तिघांचा शोध घेत होते. त्या तिघांनाही पकडण्यात मनोज भोसले यांच्या पथकाला यश आले आहे. तिघांना पकडणाऱ्या पथकाचे प्रभारी पोलीस निरिक्षक निशा जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!