बातम्या

जीवन विद्यामंडळ कसोप फणसोप वार्षिक स्नेहसंमेलनसंपन्न.

रत्नागिरी : दि.२१/१/२०२३ जीवन विद्यामंडळ कसोप फणसोप शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये पाककला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नं.१ व पाककला स्पर्धेमध्ये नं.२ पावस येथील सौ. रिद्धी ऋषिकेश गजने हिने नंबर पटकावला तिच्या या यशाबद्दल त्या शाळेतील शिक्षकवृंदामधून अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले. तसेच छोट्या मुलांच्या गितगायन स्पर्धेमध्ये शिवाजी महाराजांचा दिमाखदार वेश परिधान करून कु.श्रियांश ऋषिकेश गजने पावस याने छान पैकी शिवाजी महाराजांचा पोवाडा गाऊन १ नं.पटकावला. ही आपली पारंपरिक पद्धत जोपासत आई आणि मुलाने आपल्या शाळेचं आणि पावस पंचक्रोशीच नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक यांनी संपूर्ण शाळेतील पालक व मुलांना मार्गदर्शन केले आणि शाळेचं नाव कस उज्वल होईल याची पुरेपूर जाणीव करून दिली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन आणि सुत्रसंचलन (निवेदन) श्री गवाणकर सर यांनीउत्तम रित्या करून कार्यक्रमाची अधिक शोभा वाढवली.

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!