बातम्या

प्रजासत्ताक दिनी दिमाखदार संचलन : जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द  – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोणातून शासन कटीबध्द आहे अशा ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळयात दिली. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती होती.
            या दिनानिमित्त पालकमंत्री या नात्याने शुभेच्छा देताना मला विशेष आनंद आहे असे पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. राज्यात रत्नागिरी वासीयांइतका उत्साही प्रतिसाद कुठेच नसेल असे सांगून सोहळयात आलेल्या नागरिकांचे अभिनंदन करीत आभार आपल्या भाषणात मांनले.
         भटक्या जाती व जमाती समितीचे माजी अध्यक्ष भिकुजी उर्फ दादा इदाते यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे. ही सर्व जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे असे सांगून त्यांनी दादा इदाते यांचे अभिनंदन केले.
            या दिमाखदार सोहळयात पोलिस दलांसह, होमगार्ड, एन.सी.सी., ग्रीन आर्मी आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पथकांसह चित्ररथ यांचे संचलन यावेळी झाले. पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल यावेळी मंत्री महोदयांच्या भिकुजी इदाते यांचा सत्कार आंरभी करण्यात आला. त्यानंतर विविध गुणवंताचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ रत्नागिरी येथील चितळे नर्सिंग होम येथे..
▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!