बातम्या

देव, घैसास,कीर महाविद्यालयाच्यावतीने दिशा झोरे हिचा सत्कार.

रत्नागिरी- मुंबई विद्यापीठ आणि व्ही. डी.हरिया महाविद्यालय, शहाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन इंटर झोन पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ७६ किलो वजनी गटात भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाची तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या दिशा दिपक झोरे हिने रौप्यपदक प्राप्त केले. स्पर्धेसाठी दिशा हिला भारत शिक्षण मंडळाचे क्रीडा विभाग संचालक चंद्रकांत घवाळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दिशा झोरे हिचा पटवर्धन हायस्कूलच्या माजी विद्यार्थी सौ. उर्मिला टकले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर, संस्था कार्यवाह सुनिल वणजू, पटवर्धन हायस्कूलचे माजी विद्यार्थी प्रशांत कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे, प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, क्रीडा विभागप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात….
जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!