बातम्या

कुमारी दिक्षा प्रदिप कुड हीचे परिस्थितीवर मात करत कलागुण जोपासत दहावी परीक्षेत मिळविले मोठे यश..

रत्नागिरी ; श्रमिक विद्यालय शिवार आंबेरे येथील विद्यार्थीनी कुमारी दिक्षा प्रदिप कुड इयत्ता दहावी मध्ये शिकत होती आजच दहावीचा रिझल्ट लागला त्यामध्ये तीला ८८:९०टक्के गुण मिळाले आहेत . अतिशय गरीब घराण्यातील मुलगी परिस्थिती ही जेमतेम अनंत अडचणींना तोंड देत हे यश संपादन केले .आई वडिल शेतीभाती करून कुटुंबाचा गाडा अतिशय कष्टाने हाकतात. पण या मुलीने परिस्थिती वर व अनंत अडचणींना तोंड देऊन आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार केलं अशी मुलगी प्रत्येक घरात जन्माला आली पाहिजे. त्यात तिला संगितक्षेत्राची खूप आवड .१मेला तिने आपल्या वाडीपुजेला अतिशय अप्रतिम गायन करुन आपल्या गोड गळ्याने रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले . अक्षरशः बक्षिसांची बरसात झाली त्यानंतर तिने११ मे ला साटवली लावगण इथेही कार्यक्रम करून प्रेक्षकांना, आयोजकांना अक्षरशः भुरळ घातली तिथे तिचा मोठा सन्मान करण्यात आला . तद्नंतर ता.देवगड तिर्लीटयेथे तिचा ज्येष्ठ भजनी बुवांच्या कार्यक्रमात नवोदित भजनी कलाकार म्हणून गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सध्या संगितविषयाचे शिक्षण कोकणात नामवंत असलेले भजनी बुवा श्री संजय जनार्दन सुर्वे भडे यांच्या कडे घेत आहे. तिला ‌पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत तिचे कौतुक होत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!