गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांचे प्रतिपादन…
राजापूर – (प्रमोद तरळ) जन्मभूमीतच गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करत आपण सर्वांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, कर्मचारी आणि कुटुंब यासाऱ्यांचे सहकार्य लाभल्याची कॄतज्ञता श्री कडू यांनी व्यक्त केली ते सेवानिवृत्ती सत्कार सोहळ्यात बोलत होते
पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर यांनी गटशिक्षणाधिकारी श्री कडू यांनी शिक्षकी पेशाबरोबर गटशिक्षणाधिकारी पदावर केलेले काम आदर्शवत असून इतरांनी त्यांची प्रेरणा घेऊन मार्गक्रमण केले पाहिजे असे प्रतिपादन केले यावेळी गटविकास अधिकारी विवेक गुंड, माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर, मा. सभापती कमलाकर कदम, कॄषी अधिकारी सुहास पंडीत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी श्री कडू यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले श्री कडू यांच्यासह सेवानिवृत्त विस्तार अधिकारी भास्कर गुरसाळे, प्रशासकीय बदली झालेले अधिक्षक झोरे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी उत्तम भोसले, प्रकाश पाध्ये यांच्यासह केंद्रप्रमुख, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

