चिपळूण (ओंकार रेळेकर) खेर्डीतील सुपरफास्ट कराड हायवेमुळे गेले काही दिवस अपघाताची मालिका सुरू आहे. खेर्डीचे माझी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री.दशरथ दाभोळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खेर्डी मध्ये काही ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी केली आहे.खेर्डीतील वाढते अपघात व जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी स्पीड ब्रेकारची फार मोठी आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. सदर रस्तावर वेगाची मर्यादा नसल्यामुळे व खेर्डीतील वाढती रहदारी तसेच एमआयडीसी या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या गाड्या यांच्या नियंत्रणासाठी येथे एक पोलिस असावा अशी मागणी दाभोळकर यांनी प्रशासनाला केली आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची व्यवस्था करावी व होत असलेले नाहक बळी थांबवावेत अशी विनंती वजा सूचना त्यांनी केली आहे. दोन दिवसापूर्वीच खेर्डी बाजारपेठ मध्ये एका व्यक्तीचा हकनाक बळी अपघाता मध्ये गेला होता याची दखल प्रशासनाने न घेतल्यास रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा श्री.दशरथ दाभोळकर यांनी दिला आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
