खेड – (प्रमोद तरळ) दि. १८/७/ २०२३ रोजी गाव सवेणी शिंदेवाडी ता. खेड येथील श्री रामचंद्र कृष्णा शिंदे या शेतकऱ्याच्या चार म्हशी, MSEB च्या गलिच्छ कारभारामुळे करंट लागून मृत्युमुखी पडल्या.पण मनुष्यहानी कोणतीही झाली नाही. अनेक शाळकरी मुले, शेतकरी यांचा रहदारीचा हा परिसर आहे. मॄत म्हैशी मध्ये तीन गाबन म्हशी होत्या, ही घटना ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक सुनील शिंदे काका यांनी निर्देशनात आणून दिले. मा. शाखाध्यक्ष रोशन गुजर यांनीही फोनवरून संपर्क केला, त्यानंतर मनसेची टीम क्षणाचा विलंब न लावता तालुका अध्यक्ष श्री संदीपजी फडकले ,मा. सचिव कृष्णा शेलार, सेवेनणी शाखाध्यक्ष नदीम तलवलकर, सुकिवली शाखाध्यक्ष विशाल सागवेकर,तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता संबंधित खात्यांना फोन करून शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीर ठाम उभे राहू असे त्यांना ठोस आश्वासन दिले.

तालुका अध्यक्ष यांनी संबंधित खात्याच्या साहेबांना फोन लावून शेतकऱ्याला योग्य तो न्याय दयावा. संबंधित खात्याचे अधिकारी शिवतरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शब्द दिला आहे.चांगल्या पद्धतीने भरपाई आम्ही शेतकऱ्याला देऊ असा मनसेला शब्द दिला आहे. दहा लाख नुकसानभरपाई मिळाली पाहीजे. त्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता अनेक लाईटचे पोल गंजलेल्या अवस्थेत आहेत ते कधीही पडू शकतात. हे लक्षात आणून दिले असता तातडीने पोल बदलून घ्यावे ही सुचना देण्यात आली त्यावेळी उपस्थित सर्व गावाचे ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
