राजापूर – (प्रमोद तरळ) तुम्ही ठरवा तुम्हाला कसं जगायचं? काय मिळवायचं ? काय द्यायचंय , तुम्हाला कसा आनंद होईल तुम्ही ठरवा खरं म्हणजे तुम्हीच तुमचे स्वतःचे शिल्पकार आहात तुम्हाला अभ्यास अभ्यास महत्त्वाचा आहे गुण महत्त्वाचे आहेत पण गुण म्हणजे सद्गुन संस्कार पण महत्त्वाचे आहेत आपापल्या क्षेत्रात गुणवंत व्हा. जगावं कसं असं जगाव इतिहासने आपल्यासाठी एक पान राखावे असे प्रतिपादन जिजामाता विद्या मंदिर रायपाटणचे मुख्याध्यापक दामोदर लिंगायत यांनी केले ते सन २०२३-२४ च्या इयत्ता दहावीच्या सदिच्छा समारंभात बोलत होते जिजामाता विद्यामंदिर रायपाटण येथे इयत्ता दहावीचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दामोदर लिंगायत होते यावेळी इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर इयत्ता दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी तीन वर्षांमध्ये आपल्या अनेक अनुभव कथन केले अनेक विद्यार्थ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली सर्व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर विद्यालयातील शिक्षक श्री गौतम पांगरीकर श्री सुनील कुंभार श्रीमती पल्लवी सावंत शिक्षकेतर कर्मचारी संदीप कोलते यांनी आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती पल्लवी सावंत यांनी केले
- Home
- रायपाटणच्या जिजामाता विद्या मंदिर दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न..