विजय शेडमाके
दि/२२/०३/२०२४
गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते आणि त्यांच्या पत्नी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून पराभूत झालेल्या डॉ. चंदा कोडवते यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. डॉ. कोडवते हे लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी यासाठी अनेकदा दिल्लीवाऱ्या केल्या मात्र या क्षेत्रातून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे कळताच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ते जवळचे मानले जात होते. काँग्रेससाठी हा एक धक्का मानला जात आहे