मुंबई:- (प्रमोद तरळ) गीतकार भारत कवितके यांच्या युट्यूबवर नव्याने आलेल्या ” राणी सांजवेळी..” या गाण्याने धमाल उडवून दिली आहे. पी.पी.म्युझिक समुह व्दारा निर्माता श्रीराम घडे, गीतकार पत्रकार भारत कवितके, गायक व संगीतकार सागर खरात आणि विशेष सहकार्य लाभलेले कवी,गायक, दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी या सर्वांच्या प्रयत्नातून युट्यूबवर आलेल्या ” राणी सांजवेळी…” या गाण्याने तरुण तरुणींच्या ह्रदयात आपले स्थान निर्माण केले आहे.पत्रकार भारत कवितके यांनी युट्यूबवर गीतकार म्हणून प्रथमच प्रेम गीत तयार केले आहे.” राणी सांजवेळी…” या भावगीतात प्रियकरानी प्रियसीकडे प्रेमासाठी केलेली मागणी उत्कृष्ट शब्दात मांडली आहे.कवीच्या मनातील भाव गाण्यातून सहज, सुंदर, स्पष्ट,गोड, मधुर,रसाळ, आवाजात गायक सागर खरात यांनी सादर केलेली असुन संगीतकार सागर खरात यांनी या गाण्याला कर्णमधुर,ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे.एकंदरीत सागर खरात यांनी गायन व संगीत या दोन्ही बाजूने गाण्याला योग्य न्याय दिला आहे.निर्माता श्रीराम घडे व कवी, दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी यांचे या गाण्याला विशेष सहकार्य लाभलेले आहे.” राणी सांजवेळी..” या गाण्यांमध्ये गीतकार भारत कवितके यांनी प्रेमाला होकार दिलेल्या प्रियसीने मात्र प्रियकराला भेटायला चालढकल, टाळाटाळ केली काही बहाणेही केले.याचा विचार करता रात्र संपून पहाट झाली.त्यावेळी प्रियकराच्या मनावर आलेली उदासीनता भारत कवितके यांनी आपल्या योग्य शब्दात मांडली आहे.उन्हाळे सोसले,सुखाची वेदना,दैना पुरी झाली, होकार आला,जीव वेडावला, छळणे तुझे, ओळखीचे होऊ, अनोळखी नको, रात्रीची पहाट झाली,शपथ गळ्याची, तृप्त होईना आस, भेटायचे टाळू नको,या अप्रतिम तरल शब्द रचना नी रसिक मंत्रमुग्ध होऊन गाण्यांशी एकरुप होतात.भारत कवितके पत्रकार,कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून वावरत असताना त्यांनी गीतकार म्हणून ” राणी सांजवेळी…” हे गीत तयार करून आपले वेगळे रुप उघड केले.एकंदरीत तरुण तरुणींच्या ह्रदयात या गाण्याने आपले स्थान निर्माण केले आहे.अनेक चोखंदळ रसिकांनी या गाण्याबद्दल आपल्या बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.या गीतासाठी भारत कवितके यांना विविध विभागातून अभिनंदन व शुभेच्छा येत आहेत.
- Home
- गीतकार भारत कवितके यांच्या ” राणी सांजवेळी…” या गाण्याची तरुणाईला पडली भुरळ..