रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावचे गाव विकास समितीचे नवनिर्वाचित सरपंच सुहास मायंगडे यांचा सत्कार भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केला.
भाजपा शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करा विकास योजना राबण्यासाठी मदत करा असे आवाहन यावेळी सरपंच सुहास मायंगडे यांनी केले. आंबेड गावच्या विकासासाठी सर्वोत्तोपरी सहकार्य करणार असे भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
त्यावेळी त्यांच्या सोबत भाजपा कार्यकर्ते प्रकाश खापरे उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंचांचे अभिनंदन करताना खूप आनंद होतो आहे; मोठा जनाधार आणि अनुभव पाठीशी असलेले सुहास मायंगडे गावविकासासाठी उत्तम कार्य करतील. सरपंच व नवनिर्वाचीत सदस्य यांची टीम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्कृष्ट व लोकाभिमुख कामे करतील असा विश्वास ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही फोनद्वारे संपर्क साधून सुहास मायंगडे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या केले.


धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)