बातम्या

देवतळे भागात कांडेचोराची सापडली तीन पिल्ले; प्राणिमित्र यांनी वन विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वनविभागच्या मार्गदर्शना खाली त्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात दिले सोडून.

चिपळूण : रत्नागिरी वन परिक्षेत्रातील परिमंडळ पाली येथील देवतळे भागातील जीवन जयवंत विंचू (रा. पाली, ता. जि. रत्नागिरी) यांचे घराशेजारील रिकाम्या पाण्याच्या हौदामध्ये शुक्रवारी ११/११/२०२२ रोजी दुपारी १२.१५ वा.च्या सुमारास कांडेचोराची (काळमांजर) Asian civet या प्रजातीची अंदाजे ६ महिने वयाची ३ पिल्ले आढळून आली आहे. सदरच्या तीनही पिल्लानां वाचविण्यासाठी स्थानिकांनी प्राणी मित्रांना बोलावले असता प्राणी मित्रानी सर्व प्रथम वन विभागाचे गावडे साहेब यांना कळविले त्यांच्या मार्गदर्शना नुसार वनकर्मचारी शर्वरी कदम यांच्या उपस्थिती प्राणी मित्र योगेश शिंदे आणि ईशान खानोलकर यांनी सदर पिल्लांना सुखरूप पकडून वन विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली ती सुरक्षित असल्याची खात्रीकरून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सदर चे बचाव कार्य श्री. प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी, व त्यांचे अधिनस्त न्हानू गावडे, वनपाल पाली,  रत्नागिरी यांचे मार्गदर्शना खाली पुर्ण केले.
           तरी यापुढे वन्यप्राणी मनुष्य वस्तीत आलेस किंवा संकटात सापडलेस वन विभागाचे टोल फ्री क्रमांक १९२६ या हेल्प लाईनवर अथवा वाईल्ड लाईफ सर्व्हायवर्स, रत्नागिरी या संस्थेच्या हेल्पलाईन नंबर 8796117117 वर संपर्क साधणेचे आवाहन करित आहोत.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!