लांजा : तालुक्यातील लांजा बाजारपेठ येथे संदिप स्मृती मित्रमंडळाने नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यामध्ये लांजा तालुक्यातील भडे येथील सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री संजय जनार्दन सुर्वे यांच्या बहारदार कार्यक्रमाने रसिक श्रोते आणि आजोजक अक्षरश: भारावून गेले त्यानिमित्त आयोजक दादा पाटोळे आणि लांज्याचे सन्मा. नगराध्यक्ष श्री मनोहर बाईत आणि मित्रमंडळी यांनी संजय बुवांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान केला. तसेच संजय सुर्वे बुवा हे अखिल लांजा तालूका प्रासादिक भजन मंडळ अध्यक्ष ही आहेत. त्यामुळे त्यांचं सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. संजय सुर्वे यांची भजनी बुवा अशी एक वेगळी ओळख आहे. या कार्यक्रमानिमित्त लांजा चे नगराध्यक्ष यांनी संजय सुर्वे यांचा सत्कार केला.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*