चिपळूण : (ओंकार रेळेकर) मुंबईमध्ये उच्चभ्रु लोकवस्तीमध्ये असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या दर्जाचे शिक्षण देणाऱ्या लोकप्रिय आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोकणचे सुपुत्र मुंबईमधील प्रतिष्ठित उद्योगपती श्री. प्रशांत पालशेतकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.
दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ ते दिनांक १४ नोव्हेंबर २०२७ पर्यंत कार्यकाळ असणाऱ्या आर्यन एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आर्यन उत्कर्ष पॅनल तर्फे निवडणूक लढवण्यात आली होती या निवडणुकीत श्री. गांगण गिरीश विजय श्री. उमराळे भरत रघुनाथ श्री. पालशेतकर प्रशांत अनंत श्री. आवारी राजेंद्र माधव
श्रीमती ठाकूर प्रज्ञा संजिव श्री. शिंदे रावसाहेब नाना
श्री. प्रभाकर बाबुराव दाते हे बिनविरोध निवडून आले.
चिपळूण नजीक असलेल्या पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाचे चेअरमन असलेले शिक्षण क्षेत्रात भरू कामगिरी करणारे पालशेत गावचे सुपुत्र श्री प्रशांत पालशेतकर यांनी शिक्षण क्षेत्रासह मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष राहून आपल्या उद्योग व्यवसायामध्येही नावारूपास येऊन पालशेस गावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावले आहे पालशेत गावचे सामाजिक कार्य असो , विकास काम असो, शैक्षणिक मदत कार्य या करिता त्यांचा सदैव पुढाकार असतो तळागाळातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन उच्च पदावर काम करावे या करिता प्रशांत पालशेतकर यांचे मुलांना सतत प्रोत्साहन असते या निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे श्री.गांगण गिरीश विजय पद विश्वस्त बिनविरोध,श्री. उमराळे भरत रघुनाथ पद विश्वस्त बिनविरोध, श्री. पालशेतकर प्रशांत अनंत पद विश्वस्त बिनविरोध, श्री. किशोर रामचंद्र खरे पद खजिनदार मिळालेली मत २५८ श्री. जयंत विष्णु दांडेकर पद सं.स कार्यवाह मिळालेली मत २२५ श्रीमती पाटील (राऊत) विपुला अनिरूध्द पद सं.स कार्यवाह मिळालेली मत २५०
श्री. भास्कर(अमोद) यशवंत उसपकर पद पेट्रन् असोशीएट मिळालेली मत ४७,श्री. केदार शिवकुमार काळे पद पेट्रन् असोशीएट मिळालेली मत ४२,श्री. आवारी राजेंद्र माधव पद शिक्षक प्रतिनिधी आर्यन हायस्कूल मुबंई .बिनविरोध
श्रीमती ठाकूर प्रज्ञा संजिव पद शिक्षक प्रतिनिधी म.नी दांडेकर हायस्कूल पालघर .बिनविरोध श्री. शिंदे रावसाहेब नाना पद शिक्षक प्रतिनिधी शारदासदन मुबंई .बिनविरोध
श्री. प्रभाकर बाबुराव दाते पद शिक्षक प्रतिनिधी पूर्व प्राथमिक वनिता विद्यालय मुबंई .बिनविरोध श्री. उपेद्र मोरेश्वर घरत पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १४७ श्री. कमलेश भगवानदास वारैया पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १४३ श्री. परेश चद्रकांत पाटील पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १३० श्री संतोष अशोक चुरी पद सर्वसाधारण सभासद मिळालेली मत १४५ आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या नव्या संचालक मंडळामध्ये प्रशांत पालशेतकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आणि अमोद उसपकर यांची संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल पालशेत गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पालशेतकर आणि मित्रमंडळी यांनी प्रशांत पालशेतकर यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो : 1 प्रशांत पालशेतकर