रत्नागिरी : सोशल मीडियाच्या युगात अनेक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. आता रत्नागिरीतील एका तरुणाला मोबाईल व्हिडिओ कॉल द्वारे एका महिलेने स्वतः विवस्त्र होत त्या तरुणाला विवस्त्र होण्यास भाग पाडले व त्याचे चित्रण केले त्यानंतर थोड्या वेळाने एका पुरुषाने हा व्हिडिओ त्या मुलाला पाठवला व फोन करत हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. धमकीला घाबरून त्याने 50 हजार दिले देखील.
असे पैसे उकळण्याचा प्रकार घडला. मोबाईलवर व्हिडीओ कॉल करणार्या महिलेने निर्वस्त्र होउन दाखवल्यानंतर तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यालाही निर्वस्त्र होण्यास भाग पाडून त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 50 हजार 500 रुपये उकळले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात महिला आणि पुरुषा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार,गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 11.46 ते 1.25 वा.कालावधीत अज्ञात महिलेने त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करुन त्याच्याशी संवाद साधत विश्वास संपादन केला.त्यानंतर तिने स्वतः निर्वस्त्र होउन त्या तरुणालाही तसेच करण्यास सांगून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. काही वेळाने त्या तरुणाच्या मोबाईलवर फोन करुन अज्ञाताने तुझा व्हिडिओ तयार करण्यात आलेला असून तो युट्युबवर टाकतो अशी धमकी देत गुगलपे व्दारे 50 हजार 500 रुपये घेउन फसवणूक केली. व त्यानंतर ही अधिक पैशाची मागणी केली याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र