माणगाव : राम भोस्तेकर माणगावमाणगांव शहरातील उतखोल येथील श्री दत्तगगनगिरी कृपा गृहनिर्माण सह. संस्था येथे दि. ७ डिसेंबर रोजी दत्तजयंती निमित्त श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी ८ वा. अभिषेक, ९ वा. होम हवन, ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. २.३० वा. मान्यवरांचा सत्कार समारंभ, सायंकाळी ४ वा. श्री ह. भ. प. निवृत्ती महाराज शिंदे यांचे भजन, ६ वा. श्री भैरब7 हरिपाठ मंडळ, हालीवली यांचे हरिपाठ, रात्री ८ वा. श्री दत्तजन्मोत्सव, ८.३० वा. महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष गणेश चव्हण, योगेश मोरे, सचिन मोरे, संतोष जाधव, मेंगडे, जांबले, स्वप्निल वाघ, स्वामी राजेश जंगम, प्रशांत गुजर, शरद मोरे , अशोक मर्कांड आदी सभासद उपस्थित होते.