बातम्या

६२ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात सह्याद्रि सकूल ऑफ आर्ट सावर्डे च्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांची निवड

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या प्रदर्शनासाठी व्यावसायिक व विद्यार्थी असे दोन विभाग असतात. या मधे महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे हि खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते.यावर्षी घेण्यात आलेल्या ६२व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयातील व्यावसायिक विभागातून चित्रकार प्रा. प्रदीपकुमार देडगे,चित्रकार प्रा. विक्रांत बोथरे यांची निवड झाली आहे. तसेच विद्यार्थी विभागातून १२ विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. या वर्षीचे ६२वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे.तसेच कलाकार विभागाचे मुंबई या ठिकाणी होईल.यामुळे एवढ्या कलाकृती प्रदर्शनात दिसणार हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे. निवड झालेल्या विद्यर्थ्यांची नावे खालीलप्रमाणे मूलभत अभ्यासक्रम -कु.सार्थक आदवडे कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष -कु. सुयश शिगवण रेखा व रंगकाला विभाग कु. ऋतिका शिरकर
शिल्प व प्रतिमानबंध कला – कु. प्रथमेश गोंधळी, कु. अध्वज चव्हाण, कु. प्रथमेश लिंगायत, कु. विशाल मसणे, कु. प्रितेश गोणबरे, कु. तुषार पांचाळ, कु. शुभम पांचाळ, कु. राहुल जाधव, कु. रोशन घडशी या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कलाप्रदर्शनात झळकणार आहेत. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी मा. श्री. महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी विद्यर्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे. फोटो : सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयातील चित्रकार प्रा. प्रदीपकुमार देडगे,चित्रकार प्रा. विक्रांत बोथरे, कु. तुषार पांचाळ
यांनी साकारलेल्या कलाकृतीची व्यावसायिक विभागातून निवड झाली आहे.या छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!