पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 18 जून 2022 रोजी हीराबेन यांनी 100 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
हिराबेन यांना बुधवारी २८ डिसेंबरला अहमदाबादमधील यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली होती. हीराबेन यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वृद्धापकाळ आणि आजारपण यामुळे हीराबेन यांची प्रकृती अधिकच खालावली. उपचाराला साथ न दिल्याने अखेर त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे येणार असल्याचं वृत्त आहे. मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे.
बेन यांचा जन्म 18 जून 1923मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी ‘गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते..दरवर्षी आपल्या वाढदिवसाला हिराबांची भेट घेऊन मोदी आशीर्वाद घ्यायचे. वाढदिवसाला हिराबा त्यांना कायम भेट म्हणून काही पैसे द्यायच्या. मोदींच्या ६४ व्या वाढदिवशी हिराबांनी त्यांना ५००० रुपये गिफ्ट म्हणून दिले होते. पंतप्रधान रिलिफ फंडात ते पैसे जमा करण्यात आले होते. गुजरात निवडणुकीवेळी मतदान करायला गेले असताना मोदींनी हिराबेन यांचे आशिर्वाद घेतले होते.
दखल न्यूज महाराष्ट्र