बातम्या

खेड तालुक्यातील घेरारसाळगड जानकरवाडी चा रस्ता व पाणी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष सुरू. शासन दखल घेत नसल्याने चक्क लोकवर्गणीतून रस्ता केला.

खेड : तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत किल्ले सुमारगड च्या पायथ्याशी घेरारसाळगड गावची जानकरवाडी वसली असुन स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रस्ता व पाणी या मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे. या मागासवर्गीय धनगरवाडीच्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
       घेरारसाळगड – जानकरवाडीला रस्ता व पाणी या मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी वाडीतील ग्रामस्थांचा मागील अनेक वर्षांपासून शासनदरबारी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे. शेवटी शासन दखल घेत नसल्याने वाडीतील सर्व गरीब कुटुंबांना लोकवर्गणी काढून रस्ता बनवावा लागतो हि दुर्दैवी बाब आहे.
       घेरारसाळगड जानकरवाडी कच्चा रस्त्याने वाडीमालदे गावाला जोडण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांचा सुरू आहे. हाच रस्ता भविष्यात पक्का झाल्यास शिवभक्त व पर्यटकांना किल्ले सुमारगड येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून उपयुक्त होणार आहे.

▶️ जाहिरात…
▶️ नवीन वर्षाच्या रत्नागिरी शहर वासीयांना खूप खूप शुभेच्छा..
▶️ शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)
दखल न्यूज महाराष्ट्र..


       घेरारसाळगड जानकरवाडी येथे आयणाचे पाणी या नावाचा डुरा असुन येथे पाण्याचा जिवंत झरा आहे. या डु-याचे वृध्दीकरण व आरसीसी बाधकाम करून मिळाल्यास या वाडीची पाणी समस्या कायमची सुटू शकते असे स्थानिक ग्रामस्थांचा दावा आहे.
       वाडीमालदे ते घेरारसाळगड जानकरवाडी हा 4 कि मी चा रस्त्याचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. या वाडीची पाणी व रस्ता या सुविधेची रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन  या मागासवर्गीय घेरारसाळगड जानकरवाडीला विकासाच्या मुलभूत सुविधा मिळवून देण्यास सहकार्य करावे असे जाहीर आवाहन, ” महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरी चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ जाहिरात..
▶️ चितळे नर्सिंग होम.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया व सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!