रत्नागिरी : गुजरात येथील मच्छिमारी नौका जयगड समोर ८० नॉटिकल समुद्रात समुद्रात बुडाल्याची घटना घडली कोस्ट गार्डची बोट व हेलिकॉप्टर च्या सहाय्याने खलाशाना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेत दोन खलाशांचा मृत्यू तर एक खलाशी बेपत्ता झाला असून उर्वरित खलाशाना वाचवण्यात यश आले आहे असून या नौकेतील बचावलेल्या आणि मृत खलाशांना घेऊन कोस्टगार्डचे अधिकारी मिरकरवाडा बंदरात दाखल होत आहेत. या घटनेने मच्छीमारांच्या खळबळ उडाली आहे जयगड पासून १२० नॉटिकल माईल क्षेत्राबाहेर हि घटना घडली आहे. ही घटना घडताच कोस्ट गार्ड कडून युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात आले. बोटीवर नऊजण असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी दोन खलाशी मृत झाले असून एकजण बेपत्ता झाला आहे. खलाशंच्या बचावासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आणि बोटीच्या सहाय्याने मदतकार्य करण्यात आले. बुडलेल्यांपैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. रत्नसागर असे या मच्छीमारी नौकेचे नाव असल्याचे कळते.