रत्नागिरी – ५० व्या गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या शुक्रवारी दि.०६ जानेवारी २०२३ रोजी डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम विज्ञान नगरी शृंगारी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शृंगारतळी येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी अंतराळवीर आरती पाटील यांची विशेष उपस्थित राहणार आहे.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत, पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे, शृंगारी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अब्बास कारबारी, उपाध्यक्ष शब्बीर बोट, सचिव रमजान साल्हे, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता विज्ञान दिंडी, शोभायात्रा, १२.३० ते १.३० परीक्षण व प्रदर्शन पाहण्यास खुले राहणार आहे. दुपारी २ ते ३.३० या वेळेत अंतराळवीर आरती पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. शनिवारी ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १.३० यावेळेत प्रशनमंजुषा व दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत बक्षीस वितरण समारंभ होणार आहे यासाठी गुहागर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते व पंचायत समिती गुहागरचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर उपस्थित राहणार आहेत. विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, रायचंद गळबे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शगुप्ता सौराज यांनी केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

टीव्ही, फ्रीज, ए.सी.,वॉशिंग मशीन, कूलर, डिफफ्रिजर, होम थिएटर,ओव्हन, वॉटरप्युरिफायर, फॅन इत्यादी ग्रुहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे परिपूर्ण दालन
उपलब्ध सुविधा🤝:
✔️बजाज फायनान्स
✔️HDFC फायनान्स
✔️अतिजलद सेवा
✔️घरपोच सेवा
✔️कमीत कमी डाऊनपेमेंट**
🎯उपलब्ध ब्रँड:
LG, Samsung, Whirpool, Godrej, Voltas, DAIKIN, BLUESTAR,LLOYLD, XIAOMI, REALME, ONEPLUS, Symphony, TCL, Hyundai, Crompton
या पहा, खात्री करा आणि खरेदी करा आपल्या मनपसंत वस्तू अगदी बाजारभाव पेक्षा कमी दरात उपलब्ध
आजच भेट द्या 🏃🏻♂️🤗
आमचा पत्ता✍🏻:-
मोरया मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स
गाळा नंबर ४ ५ डी.जे. स्क्वेअर, प्रमोद महाजन क्रीडा संकुल समोर, रत्नागिरी ४१५६१२
संपर्क : *9922682666