रत्नागिरी : गेले दोन महिने पगार न झाल्यामुळे आज मंगळवारी रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. नाट्यगृहाला टाळे लावून कर्मचारी संपावर गेले.
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात आठ कर्मचारी आहेत. त्यामध्ये चार चौकीदार, दोन सफाई कामगार, एक लाईटमन आणि एक साऊंडवाला असा समावेश आहे. 2016 पासून हे कर्मचारी साडेसात हजार रूपयांच्या तुटपुंज्या पगारावर काम करतात. हे सर्व कंत्राटी कामगार आहेत. गेले दोन महिने आठ कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अखेर मेटाकुटीला आलेल्या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहाला टाळे लावून हे कर्मचारी नगरपरिषद कार्यालयात पोहचले. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे नाट्यगृहाच्या चाव्या त्यांनी जमा केल्या.
कर्मचाऱ्यांचे पगार न होण्याचे कारण काय? असा सवाल विचारला जात आहे. अनेक प्रभागांमध्ये लाखो रुपयाची विकास कामे आजही सुरू असताना रत्नागिरी नगरपालिका कंत्राटदार कर्मचारी यांच्यासाठी राखीव निधी का ठेवला जात नाही? असाही सवाल या कामगारांकडून विचारला जात आहे. याच कामगारांचा नव्हे तर रत्नागिरी नगर परिषदेमधील इतर विभागातील कंत्राटी कामगार यांना देखील वेळेवर पगार मिळत नसल्याची तक्रार अनेक कंत्राटी कामगारांची आहे. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. यावरती रत्नागिरी नगर परिषदेने कायमस्वरूपी उपाय काढावा आणि नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांसाठी वेगळा राखीव निधी राखीव ठेवावा अशी मागणी केली जात आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

चालू किंवा बंद अथवा तुटलेल्या स्थितीत असलेल्या फोन ची योग्य किंमत मिळवा आणि खरेदी करा नवीन फोन➡️
सोबत EMI सुविधा उपलब्ध
नवीन मोबाईल बरोबर हमखास भेटवस्तू🎁
त्वरा करा लवकर भेट द्या आणि आपल्या जुन्या फोन ची किंमत जाणून घ्या✔️
आपलं हक्काचं दुकान😊
आमचा पत्ता✍️:
29 मोरया मोबाईल्स,शंखेश्वर आर्क्रेड, आठवडा बाजार ,रत्नागिरी
9272682666
9422392425