बातम्या

विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी गणराज क्लबच्या 7 तायक्वांडो पटुंची निवड..

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीनं व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन व शाहणुर चिपळूण तालुका तायक्वांडो अँकॅडमीच्या सहकार्याने जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा 14/17/19 वयोगटामध्ये क्रीडा संकुल डेरवण (सावर्डा) या ठिकाणी संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविलेल्या खेळाडूंची निवड कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी झाली आहे.
             कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धा दिनांक 16 ते 18 जानेवारी दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या 5 जिल्ह्यातील सुवर्ण पदक पटकावलेले सुमारे 400 खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी गणराज क्लबचे मधून 7 खेळाडू जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. 
           निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे- राधिका दर्शन जाधव (सब-ज्युनियर) जि.जी.पी.एस 38 किलो वजनीगट, आदया अमित कवितके (सब-ज्युनियर) सेक्रेट हार्ड कॉन्वेट सिटी 35 किलो वजनीगट, त्रिशा सचिन मयेकर (ज्युनियर) सेक्रेट हार्ड कॉन्वेट सिटी 44 किलो वजनीगट, गायत्री यंशवत शेलार (ज्युनियर) सेक्रेट हार्ड कॉन्वेट सिटी 46 किलो वजनीगट, गौरी अभिजित विलणकर (ज्युनियर) SVM शाळा 55 किलो वजनीगट, श्रेया गुर्जर पाध्ये (सिनियर) पावस कॉलेज 40 किलो वजनीगट, तन्मय दिपक अपर्णकर (सिनयर) पावस कॉलेज 45 किलो वजनीगट,
या यशस्वी तायक्वांडो पटूंना राज्याचे उघोग मंत्री व रत्नागिरी जिल्हाचे पालक मंत्री नामदार श्री उदयजी सांमत साहेब, उदोजक श्री. किरण सांमत, तुषार साळवी, निमेश नायर, साै.शिल्पा सुर्वे,किरण कामतेकर, दिपक पवार, मनिष जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा संघटना अध्यक्ष, राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हाचे सचिव प्रमुख प्रशिक्षक लक्ष्मण के, गणराज क्लबचे अँकँडमीचे उपाध्यक्ष अभिजित विलणकर, सचिव रंजना मोडूळा, खजिनदार नेहा किर, पुजा कवितके,कनिष्का शेरे, साक्षी मयेकर, भगवान गुरव,खेळाडूना मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख महिला प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना,क्रिडा शिक्षक अनिकेत पवार,शाहरुख शेख,मिलिंद भागवत आदिंनी शुभेच्छा दिल्या. दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ जाहिरात..
▶️ राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.
👆सेल👆स्वस्त👆सेल👆
🏡🏡🏡🏡
▶️ मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी
➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट
▶️ स्वप्नातील घर (वास्तू )साकारताना अवश्य भेट द्या..
▶️ रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी
📲 डोनर जैन
📞8209894117
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!