रत्नागिरी : “मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेलं प्रत्येक अपघाती मृत्यू, ही आपल्या काही निवडून आलेल्या “नामधारी” नेत्यांच्या नेतृत्वाच्या दयनीय अपयशाची रक्ताने लिहिलेली कहाणी आहे.” अशी टीका आपचे ज्योतिप्रभा पाटील यांनी केली आहे. दिनांक- १६/०१/२३, पाली, रत्नागिरी: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्या पाली, रत्नागिरी येथील प्रदीप धाडवे या तरुणाच्या कुटुंबाच्या असह्य नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या जिल्हा संयोजक श्री ज्योतिप्रभा पाटील यांनी आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे राज्य सचिव मा.श्री धनंजय शिंदे यांना निवेदन दिले आहे, आणि विनंती केली आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि माननीय केंद्रीय परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी श्री धाडवे यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश पारित करण्याची मागणी करावी.
श्री ज्योतिप्रभा यांनीही श्री प्रदीप धाडवे यांच्या कुटुंबीयांच्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीबद्दल अत्यंत निराशा व्यक्त केली असून ते बोलले आहेत की “मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेलं प्रत्येक अपघाती मृत्यू, ही आपल्या काही निवडून आलेल्या “नामधारी” नेत्यांच्या नेतृत्वाच्या दयनीय अपयशाची रक्ताने लिहिलेली कहाणी आहे, आणि जर आपल्याकडे जबाबदार नेते असते तर त्यांनी आपले नागरिक रस्त्यावर मरत असताना शांत बसले नसते.” मुंबई गोवा महामार्गाची झालेली दयनीय अवस्था पाहता खड्ड्यांचे साम्राज्य यावरती दिसत आहे आणि यामुळेच दिवसेंदिवस अपघाताची संख्या देखील वाढत आहे या सर्वावरती ‘आप’ चे ज्योतीप्रभा पाटील यांनी बोट दाखवत सत्ताधारी नेत्यांना जबाबदार धरत अपघात झालेल्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

चालू किंवा बंद अथवा तुटलेल्या स्थितीत असलेल्या फोन ची योग्य किंमत मिळवा आणि खरेदी करा नवीन फोन➡️
सोबत EMI सुविधा उपलब्ध
नवीन मोबाईल बरोबर हमखास भेटवस्तू🎁
त्वरा करा लवकर भेट द्या आणि आपल्या जुन्या फोन ची किंमत जाणून घ्या✔️
आपलं हक्काचं दुकान😊
आमचा पत्ता✍️:
29 मोरया मोबाईल्स,शंखेश्वर आर्क्रेड, आठवडा बाजार ,रत्नागिरी
9272682666
9422392425