साहित्य मंदिर नवी मुंबई, वाशी येथे दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी राजस्तरीय राष्ट्रीय लोककल्याणकारी सेवा रत्न पुरस्कार संपन्न करण्यात आला.
लौकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या ४ था वर्धापन दिनानिमित्त सामाजिक,साहित्य, शैक्षणिक आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावचे सुपुत्र मोहनजी कदम साहेब सामाजिक काम करत असतात.त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत व त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती चंद्रहास म्हात्रे, राज्यकर सह आयुक्त डेव्हिड अल्वारिस,सिने अभिनेत्री मेघना साने,उद्योजक कुणाल भोईर, सिने कलाकार तारक मेहताचा उलटा चष्मा जाकीर खान,सिने अभिनेत्री सिध्दी कामथ,सिने कलाकार महेश्वर तेटाबे,पंडित फंगाल आनंराष्टीयमानवाधिकार परिषद अध्यक्ष,अल्पना यादव, प्रदीप चव्हाण,शैलेश पवार, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
