रत्नागिरी : शहरानजिकच्या नाचणे येथे तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. उघडकीस आली. सौम्यक अनंत जाधव (19, रा. माऊली अपार्टमेंट गोडाऊन स्टॉप नाचणे, रत्नागिरी ) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना सौम्यकने सिलिंग फॅनला गळफास घेतला. सायंकाळी त्याची आई कामावरून घरी आली असता तिला सौम्यक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
दखल न्यूज महाराष्ट्र.
