रत्नागिरी : येथील पर्यावरण संस्थेच्या वतीने दि मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये पर्यावरण प्रबोधन कार्यक्रम पार पडला.यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.श्रीरंग कद्रेकर,गोगटे कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा.डॉ.गोपाळ कुलकर्णी, कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ.दिलीप सावंत उपस्थित होते.
प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. त्यानंतर डॉ.कद्रेकर, डॉ.कुलकर्णी व डॉ.सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी स्लाईड शो च्या माध्यमातून ही प्रबोधन केले. यावेळी डॉ.कद्रेकर यांनी संस्थेची आपुलकीने चौकशी केली. संस्था करीत असलेले शैक्षणिक काम हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे स्पष्ट केले.शाळेची शिस्त, शाळेची वाटचाल याबद्दलही समाधान व्यक्त केले.

