बातम्या

पत्रकार वारीशे यांच्या कुटूंबीयांची खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

राजापूर : संशयास्पद मृत्यू झालेल्या पत्रकार वारीशे यांच्या कुटूंबीयांची खासदार विनायक राऊत यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. पत्रकार शशिकांत वारिशे यांची राजापूर पेट्रोल पंपावर 'थार' गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली होतीत्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटूंबीयांची खासदार विनायक राऊत यांनी भेट घेतली. वारीशे यांच्या मुळ गावी राजापूर तालुक्यातील कशेळी गावी जात खासदार विनायक राऊत यांनी वारीशे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन वारीशे यांची आई आणि त्यांचा मुलगा यांचं सांत्वन केले. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे देखील या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे खासदार राऊत यांनी यावेळी सांगितले आहे.

▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!