बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन बसचे लोकार्पण..

मुख्यमंत्री महोदयांनी नवीन बसमधून केला प्रवास..

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागातंर्गत नवीन बसचे लोकार्पण आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.  राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी साठी मिळालेल्या या नवीन पन्नास बसेसचा प्रवाशांना चांगलाच उपयोग होणार आहे यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांची प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. 
          रत्नागिरी जिल्ह्याकरीता 50 नवीन बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह ते शासकीय विश्रामगृह या मार्गाने प्रवासही केला.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!