बातम्या

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सहशैक्षणिक उपक्रमातील कला व क्रीडा स्पर्धेतील यशासाठी या समारंभात सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या हा समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समारंभात व्यासपीठावर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. महेश भागवत (राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, आंबव), संस्था विश्वस्त प्रा. पांडुरंग भिडे सर, कनिष्ठ महाविद्यालय व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ॲड. वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना प्रमुख प्रा. अनंत पाध्ये, विद्यार्थी स्वराज्य मंडळ सचिव कु. श्रुती सागवेकर यांची उपस्थिती होती. समारंभाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात समारंभाचा उद्देश, कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रम व विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत सविस्तर आढावा घेतला. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. प्रवीण जोशी यांनी करून दिला. प्रा. भिडे सर यांनी प्राचार्य डॉ. महेश भागवत यांचा सत्कार केला. वार्षिक अहवालाचे वाचन प्रा. धनंजय दळवी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा क्षेत्रातील यशाच्या प्रमाणपत्राच्या यादीचे वाचन प्रा. अनंत पाध्ये यांनी केले. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विशेष कर्तुत्वाबद्दल दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची यादी प्रा. सुवर्णा साळवी यांनी वाचली. प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नवीन शैक्षणिक धोरण, यामधील शैक्षणिक बदल आणि विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरण व तंत्रज्ञान, सद्यस्थितीमधील वाढती स्पर्धा व विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने आणि विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा यासंबंधी सविस्तर विवेचन केले. ॲड. वेदा प्रभुदेसाई यांनी महाविद्यालय व संस्था पातळीवर राबविले जाणारे विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम याबाबतचा आढावा घेताना विद्यार्थ्यांकडून असणाऱ्या अपेक्षा याबाबत भाष्य केले. प्रा. भिडे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात जीवनातील मेहनत व सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व, यामुळे निर्माण होणारा आत्मविश्वास याची मार्मिक उदाहरणे सांगितली. वाचन, मनन व चिंतन यांचे जीवनातील महत्त्व याप्रसंगी विशद केले. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुश्री भागवत, तर आभार प्रदर्शन प्रा. एम. आर. लुंगसे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

फोटो- १. प्राचार्य डॉ. भागवत यांचा सत्कार करताना प्रा. भिडे, ॲड. प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. तेंडोलकर आदी मान्यवर.
२. विविध चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या साहिल मोवळेचा सत्कार करताना प्राचार्य डॉ भागवत आणि उपस्थित मान्यवर.
छाया- प्रा. धनंजय दळवी.

जाहिरात…
जाहिरात….

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!