रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक अध्यक्ष खासदार विनायक राऊत आणि सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत यांनी शासनाच्या योजनांचे काम वेळेत पूर्ण करा. पाणीपुरवठा संदर्भातील योजनांची कामे तात्काळ मार्गी लावा. संगमेश्वर निवळी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. महिलांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आवश्यक ती मदत करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत खासदार विनायक राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती), ई-अभिलेख, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आदि योजनांचा आढावा घेतला. दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.