बातम्या

महाविजय २०२४ या अभियानासाठी रत्नागिरी शहर भाजप सज्ज; येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांत ५१ टक्के मतदान मिळवण्याचे भाजपचे उद्दिष्ट

पक्ष संघटना बळकट करण्याचा रत्नागिरी शहर भाजप बैठकीत निर्धार

प्रतिनिधी : नीलेश आखाडे

रत्नागिरी : रत्नागिरी शहर भाजपाची महत्त्वाची बैठक गुरुकृपा मंगल कार्यालय रत्नागिरी येथे भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये पक्षाच्या बूथचे सशक्तीकरण, गौरव यात्रा, भाजपा वर्धापन दिन या विषयांवर तपशीलवार चर्चा झाली. तसेच या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी जोरकस प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीला शहराच्या ६३ बूथ पैकी ५८बूथ मधून बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र विस्तारक, नगर सेवक, शक्ती केंद्र प्रमुख, तिन माजी जिल्हाध्यक्ष व, दोन माजी नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत ५१ टक्के मतदान मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपा प्रणित मोदी सरकार केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये सत्तेत आहे. केंद्रातील सत्ता सलग तिसऱ्यांदा मिळवून हॅट्रिक करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. त्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान पक्षाने सुरु केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ७५ हजार घरी जाण्याचा कार्यक्रम संघटनेमार्फत राबविण्यात येणार आहे.
कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचण्याचा संकल्प पक्षाने केला असून दूरध्वनी च्या माध्यमातूनही लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ७८२००७८२०० या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या विविध योजनांची माहिती ॲप मार्फत मतदारांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका, गाव, वाडी आणि बूथ पातळीवर पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी जोरदार काम सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी शहरातील पक्षाची स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी शहर शाखेतर्फे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठीच आज पक्ष सशक्तीकरण, स्वा. सावरकर गौरव यात्रा 12एप्रिल, भाजपा स्थापना दिवस या बाबत बैठकीत मंथन झाले आणि एकूणच कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. बऱ्याच कालावधीनंतर अशी विस्तृत आणि सखोल कमजकाजाबाबत बैठक मोठ्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शंभरपेक्षा अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष दिपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, महेंद्र मयेकर, तालुकाध्यक्ष मून्ना चवंडे,सरचिटणीस उमेश कुळकर्णी, बाबू सुर्वे व एकूण शंभरवर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!