आ.कॄ गोखले हायस्कूल धाऊलवल्ली येथे वाचक प्रेमींसाठी उपलब्ध होणार…..
राजापूर – (प्रतिनिधी) जिवन जगत असताना सुख दुःखाच्या गोष्टी नेहमी येतच असतात.अशामध्ये जर विरंगुळ्यासाठी काही पर्याय असेल तर नवल वाटण्यासारखे मुळीच नाही.माणसाला घरातल्या किंवा इतर व्यवहारापासून जर थोडी सवड मिळाली तर आपल्या आवडीच्या विषयावर मनसोक्तपणे राबणे, किंवा इतर छंद जोपासत असताना मनाला जो आनंद होतो तो काही वेगळाच म्हणावा लागेल.लहानपणापासूनच रेडिओवर गाणं संगीत ऐकणे सवय लागून गेली होती.आई वडील दोघेही शिक्षित असल्याने माझ्यावर योग्य असे संस्कार झाले.आई वडीलांना देवदेवतांची पुस्तके वाचणे इतर गोष्टींची पुस्तके वाचण्याची फार आवड होती.साहजिकच मला सुद्धा वाचण्याची आवड निर्माण झाली.जवळ जवळ आठ दहा वर्षांपासून मी नियमीत म.टाईम्स हे वृत्तपत्र वाचत आहे.वाचन करत असताना विविध सदरातील वाचण्यायोग्य माहितींची कात्रणं कापून चिकटविण्याची कल्पना मनामध्ये आली.नोकरी करत असताना मिळणाऱ्या रिकाम्या वेळेत अशी कात्रणं कापून ठेवायची व ती काडऀ पेपरवरती चिकटविणे असा तिन महीने रोजच दिनक्रम चालू असायचा.ऐंशी कार्डपेपर मागे पुढे अशी चिकटवून प्रोजेक्ट तयार केला.यामध्ये मुंबईचा थोडाफार पुर्वइतिहास, कलासंगीत विषय, ज्ञानविश्व व इतर अनेक सामाजिक विषयक माहिती असून ती शाळेतील विद्यार्थ्यांना याबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी इतर विषयांचे आकलन व्हावे असा हेतू असल्याचा आयर यांने सांगितले या प्रोजेक्ट बद्दलची माहिती समाज माध्यमापर्यत पोहचविण्यासाठी माझ्या राजापूर तालुक्यातील पत्रकार श्री प्रमोद तरळ यांनी मला ही कल्पना दिली त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.
आपण कोणी वाचक प्रेमी असाल तर हा प्रोजेक्ट आ.कृ.गोखले मा.विदयालय धाऊलवल्ली ता.राजापूर या माझ्या शाळेमध्ये ठेवण्यात येणार आहे.आपण वेळ मिळाल्यास नक्कीच वाचावा तुम्हाला तो आवडेल आपल्या ज्ञानसागरात भर पडेल
हा छंद जोपासत असताना मासेमारी, खाडीतील शिंपले, कालवे काढणे हे छंद देखील मनापासून जोपासत असतो.यातुन मला खूप आनंद वाटतो.याशिवाय मला कुमार सानू या गायकाची गाणी ऐकायला खुप आवडतात.त्यांच्या १७५ गाण्याचा संच बनविला असून रिकाम्या वेळेत गाणं म्हणने व ऑनलाईन गाणी गात असतो असेही आयर यांनी पुढे सांगितले.. दखल न्यूज महाराष्ट्र
