चिपळूण (ओंकार रेळेकर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्या अध्यक्षतेखाली सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत नुकतीच रत्नागिरी (मध्य – उत्तर ) जिल्हा सचिव संतोष मधुकर नलावडे यांची (महाराष्ट्र राज्य ) चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल श्री. नलावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून संतोष नलावडे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन मनसे पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. याची दखल घेऊन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी संतोष नलावडे यांच्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. होती यानंतर उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिव पदी नेमणूक केली. आता तर राज्य चिटणीस पदी निवड करून राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. याबाबत संतोष नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष युवा नेते अमित ठाकरे आणि वरिष्ठांनी आपली राज्य चिटणीस पदी निवड करून दाखवला आहे तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या निवडीचे पत्र देताना कार्याध्यक्ष संदिप कवळे, खेड तालुका प्रवक्ते संभाजी देवकाते आदी उपस्थित होते. या निवडीबद्दल चिपळूण तालुक्यातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र..