राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील सोल्ये हसोळ गावचे सुपुत्र शाहीर,गायक प्रफुल्ल पुजारी यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी त्यांचे आई महालक्ष्मी कलापथक (उन्हाळे) सज्ज झाले आहे
तुरेवाले शाहीर प्रफुल्ल पुजारी हे रामचंद्र पंडित घराण्यातील नामवंत शाहीर, गुरु पुनाजी अर्जुन, वस्ताद सोनू तानाजी यांचे शिष्य आहेत पुजारी यांनी आजवर गणपतीची गाणी, श्रद्धांजली गीत, लग्नगीत, शक्ती तुरा व्हिडिओ कॅसेट, प्रबोधन गीते व भजने गायली आहेत आणि ती रसिकांना भावली आहेत पहाडी आवाजाचे युवा शाहीर प्रफुल्ल पुजारी हे रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले असून राजापूर तालुक्यातील नामवंत शाहीर अशी त्यांची ओळख आहे कोकणातील प्रसिद्ध जाखडी कलेच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांची सेवा करायला सज्ज झाले आहेत… दखल न्यूज महाराष्ट्र
