मुंबई विद्यापीठाच्या ५६व्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या सुयोग चंद्रकांत रहाटे याने फाईन आर्ट प्रकारातील कार्टूनिंग(व्यंगचित्र) कलेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. सुयोग रहाटे महाविद्यालयात द्वितीय वर्ष बी. व्होक.-बँकिंग अँड फायनान्स या वर्गात शिक्षण घेत आहे. गतवर्षी सुयोग याने याच स्पर्धेत मुंबई विद्यापीठाची २ रौप्य पदके प्राप्त केली होती. कार्टूनिंग स्पर्धेसाठी आयोजकांनी 'मुंबई मेरी जान' आणि 'वर्क फ्रॉम होम' हे दोन विषय दिले होते. सुयोग याने 'मुंबई मेरी जान' या विषयावर कार्टूनिंग करून परीक्षकांची मने जिंकून विजेतेपद प्राप्त केले. सुयोग रहाटे याला कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास राहटे आणि प्रा.धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व मार्गदर्शक विलास रहाटे यांनी मार्गदर्शक म्हणून या स्पर्धेत अनोखा विक्रम केला आहे. विलास रहाटे यांनी मार्गदर्शन केलेल्या सुवर्णपदक प्राप्त सुयोग रहाटेसह, जोशी-बेडेकर कॉलेज, ठाणे येथील श्रुती कामतने रौप्यपदक तर मिठीबाई कॉलेज, विलेपार्ले येथील झोया वारसीने कांस्यपदक प्राप्त करून विजेतेपदाची हॅट्रिक साधली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सुयोग आणि विलास यांच्या यशाचे कौतुक करताना सांगितले की, या दोघांची प्रचंड मेहनत पाहता हे यश अपेक्षितच होते. आमचे सर्व यशस्वी विद्यार्थी ही महाविद्यालयाची संपत्ती असून, त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, असे याप्रसंगी नमूद केले. दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे संसाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो- १. सुयोग रहाटे याला सन्मानित करताना उपस्थित मान्यवर.
२. सुयोग राहटे याचे सुवर्णपदक प्राप्त कार्टूनिंग.
छाया- विलास राहटे. दखल न्यूज महाराष्ट्र.
