रत्नागिरी शहर प्रतिनिधी- हर्ष नागवेकर
मा. नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार, उदय सामंत फाउंडेशन व शिवसेना तालुका महिला आघाडी आयोजित तालुक्यातील महिला भगिनींसाठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी , रत्नागिरी मधील कुरतडे हायस्कूल येथे श्रावणोत्सव आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रावणातील पारंपारिक खेळ, झिम्मा फुगडी व गाणी अशा स्वरुपात ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण 12 संघांनी सहभाग घेऊन या स्पर्धेला वर्चस्व प्रदान केलं. दिवसभर सुरू असणाऱ्या या स्पर्धेच्या जल्लोषाच्या अंतिम निकालामध्ये सोमेश्वर गावातील नागेश्वर नागवेकर वाडी महिला संघाने बाजी मारत रत्नागिरी तालुक्यामध्ये बाई पण भारी देवा म्हणत स्वतःची एक अभिमानास्पद छाप उमटवली.
नागवेकर वाडी संघाने अतिशय उत्कृष्ट पारंपारिक नृत्य पद्धती, निरनिराळी पारंपरिक गाणी एक दर्जेदार सादरीकरण सोबतच , स्त्री-भ्रूणहत्या, स्त्री सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, कौटुंबिक हिंसा यावर आधारित सादरीकरण करून आपल्या पारंपारिक नृत्य आणि गाण्यांमधून संदेश देत समाज प्रबोधन देखील केलं. एक स्त्री किती वेगवेगळ्या प्रकारे आपली जबाबदारी आणि कर्तव्य निष्ठेने पाळते हे दाखवण्यासाठी एक देखावा दाखवला. यात वकील, डॉक्टर, पोलीस, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, सैनिक, पायलट, शेतकरी सुद्धा दाखवली. या सगळ्या जबाबदाऱ्या देशासाठी सांभाळूनही ती मातृत्वही जपते हे बाळ हाती घेऊन दाखवलं. हा देखावा सर्वात प्रशंसापूर्ण व सर्वोत्कृष्ट ठरला.
खरंतर या सर्वच महिला नेहमीच घर , संसार यामध्येच पूर्णपणे अडकून होत्या. परंतु तरीही मिळून साऱ्याजणी म्हणत साऱ्या जणींनी स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचं ठरवलं. घर-संसार, काम हे सारं काही आटोपल्यानंतर रात्रीच्या वेळी एकत्र जमून केवळ स्पर्धेसाठीच नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी ही तयारी करत होत्या.
आणि या स्पर्धेनंतर शेवटी याच स्त्रियांनी दाखवून दिलं की एका स्त्रीने मनात आणलं तर कोणत्याही वयात कोणत्याही परिस्थितीमध्ये स्त्री ही स्वतःच वर्चस्व सर्वोच्च सिद्ध करते.
म्हणूनच विजेते आणि स्पर्धक सर्वच महिला संघाच्या प्रयत्नांना आणि यशाला सलाम. दखल न्यूज महाराष्ट्.
